होईना इग्रजांनी हि एक गोष्ट मात्र खूपच चांगली केली.
लग्नापूर्वीची सावित्रीबाई
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ ला नायगाव सातारा इथे झाला.
ज्योतीबासोबत विवाह
त्या काळी बालविवाह सर्रास होत असत. आणि असेच एक लग्न सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्यात झाले.त्यावेळी सावित्रीबींचे वय अवघे 9 वर्ष आणि ज्योतीबांचे वय १२ वर्षे होते.जशी ठिणगीला आगीची गरज आहे तशी सावित्रीबाईला जणू ज्योतिबा नवऱ्याच्या रूपाने भेटले होते.का कोण जाणे हेच जोडपे पुढे जाऊन महिला शिक्षणाला वाचा फोडणार होते.
फुले नावाचा इतिहास
सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.
शिक्षणाची सुरुवात
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता.महात्मा फुलेंच्या मावस आत्याला इग्रजी येत असल्याने त्यांनी महात्मा फुलेलाही यासाठी प्रोत्साहित केले. पुढे महात्मा फुलेंनी सावित्राबाईनाही शिक्षण शिकवले
खऱ्या अर्थाने शिक्षणकार्याला सुरुवात
या शिक्षणाच्या मदतीनेच १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली.पण लवकरच हि शाळादेखील बंद झाली.१ जानेवारी १८४८ पुण्यातील बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली.समाज्याच्या विरोधाला न जुमानता त्या जोडप्याने तब्बल १८ शाळा केवळ ४ वर्षात काढल्या.तत्कालीन भारतातील पहिली मुलींची शाळा हीच होती.सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली
शिक्षण देण्याव्यतिरिक्त कार्ये
सती प्रथेला विरोध,स्त्रियांचे केशवेपन थांबवण्यासाठी नाभिक समाजाला प्रबोधन करून घडवलेला संप,भृणहत्या थांबवण्यासाठीचे प्रयत्न, बालहत्या थांबण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहांची स्थापना ,पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न असे कित्येक कार्य करण्यास सावित्रीबाई फुले स्वतःच्या जोडीदारासोबत सदैव उभ्या राहिल्या. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ साली आलेल्या दुष्काळात त्यांनी समाजात पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.या कार्यात त्यांना पंडिता रमाबाई आणि गायकवाड सरकार यांनी मोलाची मदत केली.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ जोर धरत होती अशा काळात हा जीवघेणा रोग घरेच्या घरे आणि गावेच्या गावे उध्वस्त करत पुढे सरकत होता .प्लेग नावाचा हा संसर्गजन्य रोग पुण्यालाही हळूहळू स्वतःच्या वेळख्यात घेत होता.हा रोग संसर्गजन्य आहे हे उशिरा लक्षात आलेल्या इंग्रज सरकारने संभाव्य रुग्णांना स्थानांतरीत करण्याचा सोपा उपाय केला.सावित्रीबाईनी याच
काळात प्लेगपिढीत लोकांसाठी पुण्याजवळ एक दवाखाना सुरु केला ससाणे माळावर असलेल्या या दवाखान्यात रुंग्न आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या आश्रय देऊ लागल्या.
आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा बर आपल्याला काय आवडते तेही कमेंट करा म्हणजे पुढच्या लेखात आम्ही त्याबद्दल माहिती लिहू.
पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र...
आजही जगातील अनेक शिक्षणसंस्था या सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला वंदन करतात.गूगलने वर दाखविल्याप्रमाणे डूडल प्रकाशित प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला .
भारत सरकारने सावित्रीबाई याच्या कार्याला जाणून त्यांचे एक टपाल तिकीट १९९८ ला चालू केले.
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
इ.स. १८९६ साली आलेल्या दुष्काळात त्यांनी समाजात पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.या कार्यात त्यांना पंडिता रमाबाई आणि गायकवाड सरकार यांनी मोलाची मदत केली.
तेजस्वी ज्योत मावळली